mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिलदार व्यक्तिमत्त्व! भर पावसात देखील शेकडो युवकांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 13, 2024
in मनोरंजन, सोलापूर
दिलदार व्यक्तिमत्त्व! भर पावसात देखील शेकडो युवकांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

सांगोला | बाळासाहेब झिंजुरटे

सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक तसेच एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर साहेब,

विधान परिषद सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील, सांगोल्याचे लोकप्रिय आमदार एड. शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते व जिल्ह्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील इत्यादी मान्यवरांनी अनिलभाऊंचे फोनवरून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने वाढदिवसानिमित्त सदानंद हॉल सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकाप चे नेते व पुरोगामी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.  बाबासाहेब देशमुख, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार,  समर्थ हॉस्पिटलचे धन्वंतरी डॉ. विजयकुमार इंगवले,

सांगली येथील ब्रम्हा उद्योग समूहाचे चेअरमन मारुती माळी, बजरंग लिगाडे सर,  उद्योजक किरणभाऊ पांढरे, उद्योजक महादेव दिघे, संजय साळुंखे, प्रवीण मोहिते, प्रगती पतसंस्थेचे प्रशांत पाटील,  आपुलकी प्रतिष्ठान चे राजेंद्र यादव,  सुभाष आलदर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक सर्वश्री डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत सर व सुभाष दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदय अर्बन , एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय दूध विभाग, सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन या सर्व संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने अनिलभाऊंच्या वाढदिवसाचे नेटके नियोजन करण्यात आले होते.

शहर आणि तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम चालू असताना देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि  युवकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

तसेच विविध क्षेत्रातील युवा वर्गाने रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यामुळे दिवसभरात सुमारे 246 रक्तदात्यांनी सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रक्तदान केले. त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ मेडशिंगी व सूर्योदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेडशिंगी येथे देखील अनिलभाऊंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये देखील सुमारे 60 रक्तदात्यांनी रक्तदान करत आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या दोन्ही ठिकाणच्या रक्तदान शिबिराचे आयोजनामध्ये रेवनील ब्लड बँक सांगोला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सूर्योदय उद्योग समूहाची  सुमारे 14 वर्षांपासून अनेकविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान वाटचाल सुरू असून या उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही वर्षांपासून रक्तदाना सारख्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी या वाढदिवसाच्या निमित्ताने सूर्योदय अर्बन संस्थेच्या वतीने ‘आवर्ती ठेव सप्ताहाचे ‘ आयोजन करण्यात आले असून, काल मान्यवरांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला.

आवर्ती ठेव लखपती योजनेमध्ये या सप्ताह मध्ये सहभागी होणाऱ्या ठेवीदारांना आकर्षक असे चांदीचे नाणे देखील भेट देण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात येत आहे.   विविध उपक्रमांनी संपन्न झालेला हा वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेटचे कर्मचारी वृंद तसेच मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल इंगवले

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
Next Post
मोठी बातमी! मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आंदोलनाची पुढची दिशा; उठताही येत नाही, बोलतानाही त्रास

माेठी बातमी! मराठा आरक्षण प्रश्‍नी जरांगें पाटलांचा सरकारला 'या' तारखेपर्यंत अल्टीमेटम, उपाेषण स्‍थगित; तोडगा न काढल्यास विधानसभेच्या रिंगणात उतरणार

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा