टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलांचा उर्वरित हप्ता मिळावा सन २०१८-१९ मध्ये ही घरकुल मंजूर झालेली आहेत घरकुल धारक हे पायाभरणी पासून भाडोत्री घरामध्ये राहत आहे.
सदर घरकुल पूर्ण करण्यासाठी इतर लोकांकडून हातउसने बँकांनी बँकांचे कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम नियमाप्रमाणे पूर्ण केलेले आहेत.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून दर घरकुलाचा आता मिळत नसेल तर नागरिकांचे शासनाने अनुदान देण्यास वेळ केल्यामुळे नागरिकांच्या अनुदान यापेक्षा जास्त पैसे हे घराचे भाडे व बँकांचे व्याजदर हातउसने घेतलेल्या लोकांना देण्यासाठी रक्कम ही अनुदाना पेक्षा जास्त होत चालली आहे.
तरी लवकरात लवकर मंगळवेढ्यातील पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरित निधी घरकुल धारकांना वर्ग करावा अन्यथा नगरपालिकेवर गाढव मोर्चा करून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
आंदोलन दि.२२ जानेवारी २०२१ ला घेण्यात येणार असल्याचा इशारा आदित्य हिंदुस्तानी यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज