mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

करारा जवाब मिलेगा! भारत सरकारनं आखली मोठी योजना; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा सामना करण्यासाठी खेळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 29, 2025
in राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादला आहे, त्यानंतर भारताने या करावर मात करण्यासाठी एक उत्तम योजना आखली आहे. प्रत्यक्षात, ट्रम्प यांच्या कराचा भारतातील कापड उद्योगावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे.

ज्याचा सामना करण्यासाठी भारताने योजना तयार केली आहे. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेने लादलेले अतिरिक्त 25 टक्के शुल्क आजपासून म्हणजे 27 ऑगस्टपासून लागू झाले आहे. आता 50 टक्के सीमाशुल्क लादण्याच्या दरम्यान कापड निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

कापड उद्योग वाचवण्यासाठी आणि कपड्यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने 40 देशांशी संपर्क साधण्याची योजना आखली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी (27 ऑगस्ट 2025) ही माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, नेदरलँड्स, पोलंड, कॅनडा, मेक्सिको, रशिया, बेल्जियम, तुर्की, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या कराचा कोणताही परिणाम होणार नाही

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत या 40 बाजारपेठांमध्ये कापड उत्पादनांचा विश्वासार्ह, दर्जेदार, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण पुरवठादार बनण्याच्या दिशेने काम करेल. भारतीय मिशन आणि निर्यात प्रोत्साहन परिषदा (ईपीसी) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

जरी भारत आधीच 220 हून अधिक देशांमध्ये कापड निर्यात करतो, तरी हे 40 देश एकत्रितपणे सुमारे 590 अब्ज डॉलर्सचे जागतिक कापड आणि कपडे आयात करतात. या आयातीत भारताचा वाटा सध्या पाच ते सहा टक्के आहे.

अशा परिस्थितीत, या देशांशी विशेष संपर्क साधण्याचा हा उपक्रम बाजारपेठ विविधीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादलेले अतिरिक्त 25 टक्के शुल्क 27 ऑगस्टपासून लागू झाले आहे.

‘या’ क्षेत्रांच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

ट्रम्पच्या शुल्कामुळे कापड, रत्ने आणि दागिने, चामडे, मासे, रसायने आणि यंत्रसामग्री यासारख्या क्षेत्रांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. केवळ कापड क्षेत्राचे अमेरिकेला होणारे निर्यात नुकसान 10.3 अब्ज डॉलर्स असू शकते.

अ‍ॅपेरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (AEPC) चे सरचिटणीस मिथिलेश्वर ठाकूर म्हणाले, उद्योगाने आधीच 25 टक्के शुल्क दर स्वीकारला होता, परंतु आता अतिरिक्त 25 टक्के शुल्क लागू केल्याने, बांगलादेश, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या तुलनेत भारताची स्पर्धात्मकता 30 ते 31 टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळं, भारतीय कापड उद्योग अमेरिकन बाजारपेठेतून जवळजवळ बाहेर पडला आहे.

सरकारकडून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी

सरकारकडून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली जेणेकरून उद्योग संकटातून बाहेर पडू शकेल. कापड उद्योग आता ब्रिटन आणि EFTA देशांसोबत व्यापार करारांद्वारे तोटा भरून काढण्यासाठी शक्यता शोधत आहे. सरकारच्या योजनेअंतर्गत, EPC निर्यात बाजारपेठांचे मूल्यांकन करतील आणि उच्च मागणी असलेल्या उत्पादनांची ओळख पटवतील.

सुरत, तिरुपूर, भदोही सारख्या कापड उत्पादन क्लस्टरना आंतरराष्ट्रीय संधींशी जोडले जाईल. तसेच, ‘ब्रँड इंडिया’ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आणि व्यापार मेळ्यांमध्ये सहभाग देखील सुनिश्चित केला जाईल.

मुक्त व्यापार करार आणि व्यापार करार भारतीय उत्पादने स्पर्धात्मक बनविण्यात मदत करू शकतात. अशा परिस्थितीत, हे धोरणात्मक प्रयत्न भारतासाठी जागतिक कापड निर्यात बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याची संधी बनू शकतात

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
Next Post
दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा