मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी विविध प्रयोग सुरु आहेत. तर दुसरीकडे शाळेला गुणवत्ता पूर्ण शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळावा यासाठी उपोषण सुरू केले आहे.
तब्बल 1 वर्षांपासून शिक्षकच नसल्याने मंगळवेढा तालुक्यातील लवंगी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी व गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी व आमदार समाधान आवताडे यांना निवेदन दिले आहे.
स्थानिक शिक्षक नको, गुणवत्ता पूर्ण शिक्षक आम्हाला मिळालेच पाहिजेत, शिक्षण आमच्या हक्काच अशा घोषणा देत विद्यार्थ्यानी परिसर दणाणून सोडला.
शाळेला शिक्षक मिळावा या मागणीसाठी लवंगी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी, आमदार कार्यालय गाठले. आणि शाळेला शिक्षक मिळावा म्हणून निवेदन दिले.
शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने याआधीही ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. परंतु, त्यावर प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.या शाळेत गरीबांच्या मुला-मुलींनी शिकायचे की नाही असा सवाल या ग्रामस्थांनी केला आहे.
शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकांनी वारंवार मंगळवेढा गटशिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र त्याची दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी पालकांनी रोष व्यक्त केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज