टीम मंगळवेढा टाईम्स ।
काही अर्थ वाढवावा ! संसार सुखे करावा !! हे ब्रीदवाक्य घेऊन धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची 10 वर्षांपूर्वी स्थापना झाली. या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर साजरा करत आहोत या निमित्ताने…
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांनी या अगोदर धनश्री महिला पतसंस्थेची स्थापना केली. परंतु पतसंस्थेच्या शाखा विस्तारास निर्बंध आल्याने सन २०११ साली धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची स्थापना केली.
संस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे,
ग्राहकांचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध
तो जोपासून खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू ठेवली आहे. आतापर्यंत सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी धनश्री मल्टिस्टेट ने आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत,
ग्राहकांना ३१ शाखांद्वारे मिळतेय बँकिंग क्षेत्रातील सेवा
मुख्य कार्यालयासह ३१ शाखांद्वारे ही बँकिंग क्षेत्रातील सेवा दिली जात आहे. एकीकडे सहकार क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाल्याने अनेकांची अवस्था बिकट झालेली पहावयास मिळते आहे. संस्था ही काटकसरीने व तितक्याच कटाक्षाने चालवली तरच संस्थेचे भवितव्य टिकून राहील.
सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांच्या कार्याचे कौतुक
हेच धर्य मनात ठेवून चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे व संचालक मंडळानी वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यालयासह ३१ शाखांमध्ये जवळपास १५० हुन अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
संस्थेत येणारा प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी देव
संस्थेत येणारा प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी देव आहे असे समजून त्यांना चांगली सेवा देण्याचे काम इथला प्रत्येक कर्मचारी बजावत असतो. मग त्यामध्ये शाखाधिकारी पासून ते पिग्मी एजंट, शिपाई पर्यंतचा त्यामध्ये समावेश असतो.
व्यवहारानंतर ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा उपलब्ध
सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. ३१ शाखांमधून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे ही सेवा दिली जात आहे. प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेत झालेला व्यवहार हा प्रत्येक ग्राहकांच्या दृष्टीने पारदर्शक होण्यास मदत ठरते.
मिनी एटीएम मशीनचीही सुविधा उपलब्ध
अन्य बँकेतील एटीएम कार्ड द्वारे पैसे काढण्यासाठी मिनी एटीएम मशीनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरटीजीएस व एनइएफटी सुविधा उपलब्ध
त्याचबरोबर बाहेरच्या बॅंकेत ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी आरटीजीएस व एनइएफटी सुविधा उपलब्ध आहे.
मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर
मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर असून जेष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के व्याजदर जास्त दिले जाते.
दामदुप्पट ठेव, लखपती ठेव व कन्यारत्न रिकरिंग ठेव
त्याचबरोबर रिकरिंग ठेव, दामदुप्पट ठेव, लखपती ठेव व कन्यारत्न रिकरिंग ठेव या सारख्या ठेवींही आकर्षक व्याजदरासह स्वीकारली जातात.
दिर्घमुदत, सोने तारण, वाहन तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध
त्याचबरोबर कर्जस्वरूपामधून वैयक्तिक, मध्यम, दिर्घमुदत तसेच सोने तारण व वाहन तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
आर्थिक वर्षात १ कोटी ९४ लाख इतका नफा
संस्थेचे ३१ मार्च अखेर ४०८ कोटी ठेवी होत्या त्यामध्ये गत वर्षीपेक्षा १०७ कोटी ठेवींची वाढ झाली होती. तसेच आर्थिक वर्षात १ कोटी ९४ लाख इतका नफा झाला आहे.
कर्जदारांकडून योग्य वसुलीचे नियोजन
संस्थेकडून देण्यात आलेल्या कर्जदारांकडून योग्य वसुलीचे नियोजन करून कर्जाची नियमितपणे परतफेड करून घेतल्याने संस्थेचा रिकव्हरी रेट सुध्दा चांगला आहे.
५०० कोटी ठेवीकडे वाटचाल
एकीकडे कोरोना काळात सर्वच स्तरावर आर्थिक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असतानाही धनश्री मल्टिस्टेटने खातेदारांना तत्पर सेवा देत त्यांचा विश्वास संपादन करून ५०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.
ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची घौडधौड सुरू
ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची घौडधौड सुरू आहे. यापुढेही खातेदारांचा असाच विश्वास कायम राहील हीच अपेक्षा आम्ही बाळगतो. आणि धनश्री मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेचा १० वर्धापनदिनाच्या व विजयादशमी च्या सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतकांना खुप खुप शुभेच्छा..
संकल्पना : सरव्यवस्थापक मा.रमेश फडतरे
शब्दरचना : मा.प्रवीण गांडुळे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज