टीम मंगळवेढा टाईम्स।
धनश्री परिवाराने मंगळवेढ्यासह जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांनी व्यक्त केले.
धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा घेरडी विस्तारित कक्ष जवळा या कक्षेचा उद्घाटन सोहळा मंगळवार पार पडला.
याप्रसंगी जयवंत बोधले महाराज बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक (आबा) साळुंखे-पाटील हे होते.
व्यासपीठावर उच्च शिक्षण मंडळ सांगोलाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, काँग्रेस आयचे प्रांतिक सदस्य पी.सी. झपके, पुरोगामी युवक संघटना शेकाप महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, लयभारी उद्योग समूहाचे पंडितराव साळुंखे-पाटील, जवळाच्या सरपंच सुषमाताई घुले,
आगलावेवाडीच्या सरपंच शांताबाई हाके, भोसेवाडीच्या सरपंच रंजना वगरे, बुरंगेवाडीच्या सरपंच राजाक्का बुरंगे, श्री सद्गुरू सिताराम महाराज सोसायटीचे संचालक राजू वाघमारे, सागर मिसाळ, साहेबराव पाटील यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे जयवंत बोधले महाराज म्हणाले, सांगोला तालुक्यातील जवळा ही बाजारपेठ मोठी आहे. येथील अर्थकारणाला चालना देण्यासाठी या ठिकाणी धनश्री परिवार सदैव तत्पर राहील. काही अर्थ वाढवावा ! संसार सुखे करावा !! हे ब्रीदवाक्य घेऊन धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची वाटचाल सुरु आहे.
समाजात अर्थकारण वाढले तरच आपला संसार हा सुखाचा होणार आहे. अर्थकारणाच्या दृषटीकोनातून माणूस उभा राहिला पाहिजे. समाजासाठी काहीतर केले पाहिजे. समाजकल्याणाच्या माध्यमातून लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारे सहकाराचा महामेरू म्हणजे प्रा.शिवाजीराव काळुंगे हे आहेत.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश आपल्याला नक्की मिळेल. या उक्तीप्रमाणे धनश्री परिवाराने मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तसेच इतर तालुक्यामध्ये भरीव योगदान दिले आहे.
याप्रसंगी दीपक (आबा) साळुंखे-पाटील म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील सहकार भूषण म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. असे प्रा.शिवाजीराव काळुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या धनश्री परिवाराच्या माध्यमातून हजारो जणांचे संसार फुलले आहेत.
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्रीडा कला क्षेत्रातील अनेक विविध उपक्रमामध्ये धनश्री परिवाराचे योगदान राहिले आहे त्यामुळे धनश्री परिवाराचे नाव सर्वदूर पसरले आहे. याचे खरे श्रेय प्रा.शिवाजीराव काळुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.
साखर कारखाना हा शेतकऱ्यांचे आर्थिक केंद्रबिंदु आहे. या आर्थिक केंद्रबिंदू जिवंत ठेवण्यासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे मोठे योगदान आहे. सांगत धनश्री परिवारच्या अर्थिक व सहकार क्षेत्रातील कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी बाबुराव गायकवाड, पी.सी. झपके, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनश्री मल्टीस्टेटचे संचालक प्रा.मारुती सावंत यांनी केले.
याप्रसंगी अरुण घुले, लयभारी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा प्रमोद साळुंखे-पाटील, धनश्री मल्टीस्टेटचे संचालक सतीश दत्तू, सोमाआबा मोटे, ॲड.गजानन भाकरे, शशिकांत केदार, राजेंद्र गावडे, राजेंद्र कोळेकर, योगेश खटकाळे, सुखदेव बंडगर, रामलिंग पाटील, दिलीप मोटे,
मल्हारी घेरडे, अनिल खडतरे दत्ता खांडेकर दत्तात्रय सर्वे, शिवाजी गावडे (सावकार), आप्पासाहेब बंडगर, राजेंद्र हगरे, तुकाराम भुसनर, बाळू भुसनर, बाबासाहेब इमडे, बाळासो गावडे, आबासो बुरंगे, बबन गावडे, प्रवीण साळुंखे- पाटील, मधुकर चौगुले, नामदेव काळेल, किसन नरळे, सुखदेव माळी, मोहन गावडे,
धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, धनश्री मल्टीस्टेटचे शाखा घेरडीचे शाखाधिकारी बाळासो टेकळे यांचेसह जवळा व घेरडी पंचक्रोशीतील खातेदार, ठेवीदार व कर्जदार तसेच धनश्री मल्टीस्टेटचे सर्व शाखाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इंद्रजीत घुले यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज