टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. पंढरपूर येथून देवदर्शन करून घराकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत.
ही घटना मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मल्लेवाडी येथील हॉटेल स्वाद मराठीच्या समोर आज सकाळी 12 च्या सुमारास घडली आहे.
रमेश परमेश सिंदगी (वय 13, रा.मसबिनाळ ता.बसवना जि. विजापूर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर पार्वती कंटेकुर, अशोक कंटेकुर, शरणाप्पा कंटेकुर, अमृता कंटेकुर, परमेश सिंदगी, निर्मला सिंदगी, सुमंत कंटेकुर असे सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडे अकराच्या सुमारास हॉटेल स्मार्ट मराठीच्या समोर मल्लेवाडी येथे इंडिका कार (एम.एच.14 डी टी 0630) पंढरपूर येथून विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन परत घरी जात असताना फिर्यादीचा मुलगा अशोक कंटेकुर हा भरधाव वेगात कार चालत होता.
अशोक याला अचानक झोप लागल्याने कार ही हायवे रोडच्या डाव्या बाजूला जाऊन दोन-तीन वेळा पलटी झाली या अपघातात फिर्यादीस, मुलगा अशोक, पती शरणाप्पा, मुलगी निर्मला, जावई परमेश, नात अमृता, व नातू सुमंत यांना तोंडाला हाताला खांद्याला मोठी दुखापत झाली आहे.
फिर्यादीची मुलगी निर्मला हिचा मुलगा रमेश यास तोंडाला डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने तो या अपघातात मयत झाला आहे.
मयत रमेश याच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून फिर्यादी पार्वती शरणाप्पा कंटेकुर यांनी आपला मुलगा अशोक शरणाप्पा कंटेकुर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात एक जण ठार झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन चारवेळा पलटी होऊन कार रस्त्याच्या कडेला पडली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज