टीम मंगळवेढा टाईम्स ।
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
जरी ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनलच आहे
पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या
रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आलेलं असून ही आग गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. दरम्यान यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झाली आहेत.
रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेली आग पावणे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली. गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी पुढचा तासभर तरी लागला.
दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज