mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी खळबळ! माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘या’ व्यक्तीसाठी पाठवले बारामतीला खास विमान; अमित शाहांकडे जाणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 15, 2024
in राजकारण, राज्य
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात, भालके कुटुंबियांची घेणार भेट

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक असणाऱ्या माढा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंजक आणि वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. माढ्यात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते.

मात्र, या नाराजीची भाजपकडून दखल न घेण्यात आल्याने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आता कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

या पार्श्वभूमीवर माढ्याची जागा वाचवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोहिते-पाटलांच्या जाण्यामुळे माढ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.

मोहिते-पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर हेदेखील तुतारी हाती धरतील असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतले आहे.

उत्तम जानकर यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे विशेष विमान बारामती विमानतळावर पाठवण्यात येणार आहे.

या विमानाने उत्तम जानकर हे मुंबईत उतरतील आणि देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील. याठिकाणी प्राथमिक चर्चा करुन देवेंद्र फडणवीस उत्तर जानकर यांना थेट दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचे समजते.

त्यामुळे आता सागर बंगला आणि दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीवेळी उत्तम जानकर यांच्यासमोर भाजपकडून कोणता प्रस्ताव ठेवला जाणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

उत्तम जानकर भाजपसाठी इतके महत्त्वाचे का?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत उत्तम जानकर अवघ्या 2000 मतांनी पडले होते. सोलापूर आणि माढ्यात उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

उत्तम जानकर हे आमच्यासोबत आले तर आम्ही माढा लोकसभेची निवडणूक 1 लाख 30 हजारांच्या मताधिक्याने जिंकू, असे मध्यंतरी जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले होते.

हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तम जानकर यांना भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता उत्तम जानकर काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.(स्रोत:abp माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उत्तम जानकरदेवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सावधान! बनावट बिल अन् दुसरीच केळीची रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा