टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पार्टीने माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका खूप प्रतिष्ठेच्या बनवल्या होत्या.
साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतीचा वापर यामध्ये करण्यात आला होता. या मतदारसंघातील प्रत्येक हालचालीवर स्वतः देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून होते.
राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभा, दिग्गज नेत्याच्या प्रचार सभा यांचे नेटके नियोजन झाले होते. नियोजनाच्या दृष्टीने कोणतीही जागा सोडली नव्हती
अशातच पंढरपूर मतदार संघामध्ये मंगळवेढा आणि पंढरपूर साठी स्वतंत्र दोन निवृत्त सनदी अधिकारी आणि त्यांच्यासोबत दोन्ही तालुक्यासाठी दहा जणांची केडर कार्यकर्त्यांची मुक निरिक्षकाची नेमणूक केली होती.
या टीमने बूथ स्तरापासून कार्य अहवाल तयार केला आहे. आणि तो देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.
त्यांच्या या कार्य अहवालामध्ये कोणी काय केले याचा लेखाजोखा दिला आहे. याची खडा न खडा माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोच झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज