mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केंद्राने दिली मोठी जबाबदारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 30, 2021
in राज्य, राष्ट्रीय
उपमुख्यमंत्री अजित पवारांना थकवा जाणवू लागल्याने केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर जीएसटी माफी सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या 43 व्या जीएसटी परिषदेत केली होती.

या मागणीची तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रिय वित्त मंत्रालयाने परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्त मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

ही समिती जीएसटी माफी, सवलती देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन 8 जून रोजी आपला शिफारस अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर यावर केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे.

कोरोना महामारीचा सामना करताना देशभरातील राज्य सरकारांसह, नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक साहित्याला ‘जीएसटी’ करातून सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत केली होती.

त्यांच्या या मागणीला देशातील इतर राज्यांनीही जोरदार समर्थन दिले होते. या मागणीची केंद्रिय वित्त मंत्रालयाने तात्काळ दखल घेत हा प्रश्न सोडविण्यासाठी परीषदेच्या दुसऱ्याच दिवशी मंत्रीगट समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आठ सदस्यीय समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या संयोजनाखाली ही समिती आपला अहवाल तयार करणार असून दिनांक 8 जूनपर्यंत तो केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे.

समितीच्या अहवालावरुन या केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीत संयोजक म्हणून मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा असून सदस्य म्हणून गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार,

गोव्याचे मंत्री मौविन गोडीन्हो, केरळचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल, ओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुयारी, तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव, उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लस घेण्यासाठी सेलिब्रिटी बनली चक्क कोविड सेंटरमधील सुपरवायझर; ठाण्यातील घटना

केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार

हा स्थापन करण्यात आलेला मंत्रीगट कोरोना औषधांवर ‘जीएसटी’ सवलतीच्या आवश्यकतेची तपासणी करेल तसेच त्यावर शिफारस करेल. यामध्ये कोविड प्रतिबंधित लस, औषधे, कोविड उपचारांसाठी औषधे, कोविड तपासणी किट, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, पल्स ऑक्सिमीटर, हँड सॅनिटायझर्स, ऑक्सिजन थेरपी उपकरणे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर, ऑक्सिजन जनरेटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, एन – 95 मास्क, सर्जिकल मास्क, तापमान तपासणी उपकरणे यांच्यासह कोविड विरुध्दच्या लढ्यासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल दिनांक 8 जूनपर्यंत केंद्रिय वित्त मंत्रालयाला सादर करेल. या अहवालाचे अवलोकन करुन केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.

जीएसटी परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, कोविडविरुद्धची लढाई राज्यांना आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोविडसंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड ऑक्सीजन, ऑक्सीजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सीमीटर, कोविड टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी करात सवलत मिळावी. छोट्या करदात्यांसाठी विचारपूर्वक सुलभ करप्रणाली आणावी. गेल्या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला येणे असलेली 24 हजार कोटींची जीएसटी भरपाई त्वरीत मिळावी.

कोविडकाळात लागू लॉकडाऊन परिस्थितीमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्यांना पुरेसी भरपाई मिळण्यासाठी संबंधित निकषांचा फेरविचार करावा.लॉकडाऊनमुळे झालेल्या महसुल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नसल्याने, महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी वर्ष 2022-23 ते वर्ष 2026-27 असा पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्यात यावा, पेट्रोल, डिझेल सारख्या वस्तुंवरील विविध उपकर आणि अधिभारापोटी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. वर्ष 2020-21 मध्ये सुमारे 3.30 लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांचे हात बळकट करण्यासाठी या निधीचे राज्यांना सुयोग्यपणे वाटप करावे आदी मागण्या केल्या होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवार

संबंधित बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 1, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
Next Post
महाराष्ट्रात कडक निर्बंधांबाबत ‘या’ तारखेनंतर घोषणा होण्याची शक्यता?

नागरिकांनो! 1 जूनपासून सर्वच दुकाने उघडणार? संभाव्य वेळ अशी असेल

ताज्या बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 1, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा