मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
महापालिका निवडणुका सुरू असतानाच राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठं विधान केलं.

महापालिकांनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या झेडपी निवडणुका आधी होतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोरेगाव भीमा येथे बोलत होते.

नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकासारखेच राज्यात दोन टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या पेचामुळे झेडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.

अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. पण त्याही दोन टप्प्यात होऊ शकतात. ५० टक्के आरक्षणाच्या आत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील.

त्यानंतर उर्वरित झेडपीच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलेय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्या होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जातेय.

संभाव्य तारीख आली समोर
अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका महिनाअखेरला जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक,

सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच शक्यता आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. निवडणुका जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल.

विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या, अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे अजित पवार म्हणाले.

कोणत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार?
सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय.
६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील, असे समोर आलेय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











