टीम मंगळवेढा टाईम्स |
मंगळवेढा शहरातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवजात बालक ते 17 वर्ष वयोगटातील डेंग्यू सदृश आजार असणाऱ्यांना मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
अनेक भागात सध्या डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. साधारणतः पावसाळा सुरू झाली की डेंग्यु, मलेरियाची साथ सुरू होते.
स्वच्छतेचा अभावअशा गोष्टींमुळे डेंग्यू रोग जलदगतीने फैलावत आहे. परिसरात डेंग्यू सदृश तापाच्या रोगाचा प्रसार जलद गतीने होतोय.
डेंग्यू सदृश तापाची लक्षणे-
डेंग्यूचा डास चावल्यानंतर त्याची लक्षणे तीन ते चार दिवसांत दिसू लागतात. या रोगाचा ताप खूप तीव्र असतो. तापामुळे बाधित व्यक्ती लवकर अशक्त होतो. संसर्ग झाल्यानंतर थंडी वाजून ताप येणे तसेच घसा, डोके आणि सांधे दुखणे,
अशक्तपणा, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, मळमळ, उलट्या, शारीरिक वेदना अशी लक्षणे प्रामुख्याने दिसू लागतात. रुग्णाच्या शरीरावर लाल पुरळ देखील उठतात. अशा परिस्थितीत ताप बराच काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डेंग्यू म्हणजे काय ?
डेंग्यू सदृश हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. विषाणू डासाच्या चावल्याने शरीरात येतात.
डेंगूची लक्षणे कोणती ?
डोळ्यावर सूज येणे. लिव्हरवर सूज येणे, डेंग्यू मेंदूत जाऊन झटके फिट येणे असे प्रकार घडतात.
डॉ. अमोल परदेशी (बालरोगतज्ञ)
एम.बी. बी. स. डी. सी. एच. डी. एन. बी.. एम. आर. सी. पी. सी. एच. (इंग्लंड), एक्स रेसिडेंट के. ई. एम. हॉस्पीटल, मुंबई एक्स बेल मिनियर रेसिडेंट मैक्स हॉस्पीटल, मुंबई –
महात्मा फूले जन आरोग्य योजने अंतर्गत नवजात शिशु वे १७ वर्षे वयोगटातील डेंगू सदृश , कावीळ, न्यूमोनिया रुग्णाचे मोफत उपचार केले जाणार आहेत.
या योजनेचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल परदेशी यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज