मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील बावची गावात जलजीवन मिशनची (पाणीपुरवठा) कामे न केल्याप्रकरणी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करा अशी मागणी माजी सरपंच सुखदेव चव्हाण, दलित पँथर संघटनेने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
बावची गावात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत असून पाण्या वाचून ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जल जीवन मिशनची कामे होणे गरजेचे असताना संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक ही योजना चालू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत असा आरोप करण्यात आला आहे.
गावात कामे होऊ नये यासाठी जाणूनबुजून सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून षडयंत्र सुरू आहे. ठेकेदारास पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.
या प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याप्रसंगी दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष बंडू दशरथ गवळी, माजी सरपंच सुखदेव चव्हाण, दलित पँथरचे शहराध्यक्ष आकाश रायचूर, राहुल राठोड, साहिल शेख, गणेश शालीमठ, ऋषीकेश धुमाळ आदी उपस्थित होते.।
तातडीची आज बैठक
बावची गावाच्या संदर्भात आज तातडीने सरपंच, ग्रामसेवक व सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.- शिवाजी पाटील, बीडीओ, मंगळवेढा पंचायत समिती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज