बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे अज्ञातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंगळवेढ्यात बोराळे नाका येथे रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या ठिकाणी काही जातीयवादी समाजकंटकांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची दगडफेक करुन मोडतोड करुन विटंबना केलेली आहे. त्याचप्रमाणे लातूर , अकोला व महाराष्ट्रात वारंवार दलित , ओबीसी , आदिवासी बहुजनांवर अन्याय व अत्याचार होत आहेत.
अशा जातीयवादी गावगुंडांना आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात महिलांवर , मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे व आरोपी मोकाटच आहेत.
त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात येत नाही. अशा सर्व घटनांबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असून या गावगुंड आरोपीवर कारवाई करण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. या सरकारची अशा आरोपींवर कारवाई करण्याची मानसिकता नाही.
या सरकारमधील एकही मंत्री किंवा आमदार तसेच या राज्यातील खासदार अशा अन्याय व अत्याचाराविषयी काहीच बोलत नाहीत. यावरुन या सरकारला दलित . ओबीसी , पारधी , आदिवासी या लोकांविषयी अस्मिता नाही हे सिद्ध होत आहे. व असे प्रकार दंगली भडकाविण्याच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचा व यामध्ये सरकारचाही हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर अशा आरोपींना शासन करण्यास हे सरकार असमर्थ असेल तर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन त्वरीत राजीनामा द्यावा.
तरी अशा गावगुंड, जातीयवादी आरोपींना अटक करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करुन अशा नराधमांना आम्हाला पँथरप्रमाणे धडा शिकवण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार , प्रशासन व पोलीस प्रशासन यांची राहील असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे.
याप्रसंगी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोकरे,डी.के.साखरे, विकी ढावरे,विजय शिकतोडे,अमित लोखंडे, नितीन आठवले, विशाल भंडारे, वैशाली सावंत, रेश्मा चंदनशिवे आदीजन उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज