टीम मंगळवेढा टाइम्स । कोरोना आजारावर अजूनही लस किंवा औषध बाजारात उपलब्ध झाले नसले तरीही काही औषधांचा वापर याच्या उपचारात केला जातो . यामध्ये रेमडेसिवीर , टॉसिलीझुमाब , आयटोलीझुमब यांचा समावेश आहे. Declare the rate of corona injection; Demand of Pandharpur MNS
सध्या या इंजेक्शनची मागणी वाढू लागल्याने याची चढ्या दराने विक्री सुरू असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केला असून यासाठी या औषधांचे दर वर्तमानपत्रांमधून जाहीर करावेत , अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लेखी निवेदन पाठवून केली आहे.
पंढरपूर येथील एका कोरोना रुग्णांवर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . रुग्ण अत्यंत गरीब असून त्यांना देण्यात आलेल्या एका इंजेक्शनची किंमत ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज