टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी पॅनेलला कोण आव्हान देणार याचा फैसला आज दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.
यात परिचारक गटाची भूमिका काय असणार, आमदार समाधान आवताडे हे विद्यमान संचालकांमधून कुणाला डच्चू देणार तर समविचारीतून कोण आव्हान देणार याची ऊत्सुकता लागून राहिली.
राज्यातील नाट्यमय घडामोडींमुळे कारखान्याच्या निवडणुकीबाबतची चर्चा कमी, पण तालुकावासीयांचे लक्ष राज्यातील महाविकास आघाडीकडे लागले होते.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यासाठी अर्जातील छाननीनंतर आजपर्यंत १९ जणांनी अर्ज मागे घेतले.
सध्या आखाड्यात सत्ताधारी आमदार समाधान आवताडे व परिचारक समर्थकांचे अर्ज मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत.
युती झाली तर किती जागेवर होणार, झालेला जागावाटपाचा तोडगा समर्थकांना मान्य होणार का? याची चर्चा समर्थकांत सुरु होती. अद्यापही परिचारकांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
काल दिवसभर समविचारीगटाने गटनिहाय बैठका घेवून मते जाणून घेतली.
समविचारी गटातून उमेदवारी निश्चीत केल्यानंतर होणाऱ्या नाराजांना आगामी नगरपलिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये संधी देण्याबाबत शब्द द्यावा लागणार आहे.
परिचारक गटातून अनेकांनी अर्ज भरले असले तरी जागा वाटपात तडजोड झाल्यास अनेकांना माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज