मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील दत्तात्रय भारत मोरे (वय २३) या युवकाचा ७० फूट विहिरीत पडून मृत्यू झाला.
ही घटना दि.२९ रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दत्तात्रय हा येथील संतोष केरू लेंडवे यांच्याकडे कामाला होता बुधवार दि. २९ जानेवारी रोजी साडेचारच्या सुमाराला विद्युत मोटारीला पाणी कमी येऊ लागल्याने वीज गेल्यानंतर साडेपाच वाजता संतोष व दत्ता मोटारीला काय अडकले आहे का ? हे पाहण्यासाठी विहिरीकडे गेले होते ही विहीर सुमारे ७० फूट आसल्याने दत्ता हा दोरीला धरून विहिरीत उतरत असताना हात निसटल्याने तो वरून खाली दगडी सपावर पडून पाण्यात पडला त्यास पोहता येत नसल्याने व त्यास लवकर बाहेर न काढल्याने तो मयत पावला.
त्यानंतर त्यास क्रेनने बाहेर काढण्यात आले . त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज