मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊसपडताना दिसतोय. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवली होती.
मात्र, आता पाऊस धुवाधारपणे सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सर्तकेचा इशारा जारी केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला असून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होणार आहे, यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
सोलापूर, सातारा, रायगड, पुणे, कोल्हापूरध्ये रेड अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड जालना या भागात ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस कोसळला आहे.
मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा त्यामुळे मुंबई सह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहत. रात्रभरात ठिकठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गाची लोकल सेवा उशिराने सुरू आहे.
पुढील 3 तासांत रायगडमधील आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील तासात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले.
जळगावच्या पारोळा तालुक्यात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावांमध्ये मोठे नुकसान. पळसखेडा गावात दोन्ही गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला. चिखलोड , म्हसवे तसेच शेळावे गावात चिखली नदीच्या पुराने अनेक घरांमध्ये दुकानामध्ये पाणी शिरल्याने नुकसान.
पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनदोस्त झाली असून मोठे नुकसान झाले आहे. पळसखेडा बुद्रुक येथे पिकांसह शेतातील जमीन वाहून गेली. दोन दिवसांच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसाठ्यात वाढ.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज