mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्याच्या निमित्ताने पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 1, 2021
in सोलापूर
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

टीम मंगळवेढा टाइम्स ।

कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या विविध निर्बंधाचे काटेकोर पालन होत आहे की नाही? यासंदर्भात पोलिसांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. सोलापूरकरांना ‘कोरोना’तून मुक्ती मिळवून देण्याकामी पोलीस बांधव दिवस-रात्र एक करत आहेत.

हे कमी म्हणून की काय, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी जणू सोलापूरकर पोलीसांची अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

सोलापूरचे पालकमंत्री आणि जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री अशारितीने दुहेरी फायदा उठवित ना दत्तात्रय भरणे यांनी ‘उजनी’तून ५ टीएमसी पाणी इंदापुरला वळविण्याची मर्दुमुखी गाजविली.

त्यामुळे सोलापूरकरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘झेंडावंदन’च्या निमित्ताने ते आज शनिवार १ मे २०२१ रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्याच्या निमित्ताने सदरहू पाणीप्रश्न चांगलेच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभुमीवर शहरातील मुख्य रस्तेच नव्हे तर पालकमंत्री ज्या-ज्या ठिकाणी जातील , त्या भागातील रस्ते वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली ‘पॅक’ करून ठेवले आहेत.

नेहमी कोरडी असणारी उजनी यंदा पालकमंत्र्यांच्या तथाकथित वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आली. सोलापूरकरांच्या दृष्टीने उजनी धरण हे वरदायिनी आहे. असे असताना सुद्धा या ‘उजनी’वर पुणेकरांनी नेहमीच वक्रदृष्टी ठेवली आहे ‘उजनी’तील पाणी हे सोलापूरकरांचा हक्काचे पाणी असूनसुद्धा पुणेकर त्यावर नेहमीच हक्क दाखवतात हे पालकमंत्र्यांच्या तथाकथित वक्तव्याने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

‘उजनी’तील पाण्याचा एक थेंब सुद्धा मी इंदापूरला नेणार नाही. सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन अशी मुक्ताफळेही पालकमंत्री भरणे यांनी उधळली असली तरी पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात योजनेतील हक्काचे पाच टीएमसी पाणी हे इंदापूरला नेल्याचे सिद्ध झाले आहे.

इतरवेळी शांत असणारे सोलापूरकर आता चांगलेच खवळले आहेत. विरोधकच काय पण सत्ताधाऱ्यांच्याही निशाणावर सध्या पालकमंत्री असल्याचे दिसून येते. माजी पालकमंत्री आ.विजय देशमुख यांनी तर पालकमंत्री भरणे यांना उजनीचे पाणी इंदापूरला नेत असाल तर सोलापुरात पाय ठेवू देणार नाही , असा इशारा देत खळबळ माजवून दिली.

माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनीसुद्धा एक मे च्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने तर आमचा नाद करायचा नाही, असा खणखणीत इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे सध्या चर्चेत आहेत.(पुण्यनगरी )

पोळी कशापध्दतीने भाजून घेतात ?

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची मोट बांधली तरच ‘उजनी’च्या पाण्यावर भविष्यात कोणीहीहक्कसांगूशकणार नाही.परंतु आता यात कोणकोण, आपली पोळी कशापद्धतीने भाजून घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री दत्तात्रय भरणेसोलापूर

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 10, 2026
Next Post
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

मंगळवेढा, कामती येथे खून,दरोडा टाकणारा फरार असलेला कुविख्यात दरोडेखोर जेरबंद; LCB ची धडाकेबाज कामगिरी

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा