मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कारखान्याने 97 व्या घटना दुरुस्तीनुसार तयार करणेात आलेल्या पोटनियमातील तरतुदी, सहकारी कायद्यातील तरतुदी व लेखापरिक्षणातील दोषांची पूर्तता करणेसाठी सभासदांना नोटीस दिलली आहे. सदरची नोटीस हा प्रशासकीय कामकाजाचा भाग असून पोटनियम, कायदा व शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमानुसार सहकारी संस्थेचे कामकाज चालत असते अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.
– हेही वाचा : अक्रियाशील सभासद केल्याची नोटीस बेकायदेशीर : अॅड.पवार
कारखान्याने सभासदांना दिलेली नोटीस ही बेकायदेशीर असून पडताळणीची तारीख त्वरीत कळवावी असे वृत्तपत्रातून वाचणेत आले. 97 व्या घटना दुरुस्ती अन्वये पोटनियम दुरुस्तीबाबत साखर आयुक्त पुणे यांनी कळविलेनुसार मागील संचालक मंडळाचे कालावधीत बोलाविलेल्या दि.23/4/2013 रोजीचे विशेष सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी मंजुरी दिलेल्या पोटनियमानुसार संस्थेचे कामकाज चालु आहे.
पाच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वर्गवारी करणेचा कार्यकारी संचालक यांना अधिकारी नाही असेही बातमीत मोघमात म्हटले आहे. पोटनियमास दि.19/11/2014 रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांनी मंजुरी दिलेली आहे. दि.19/11/2019 रोजी सदर पोटनियम मंजुर होवून पाच वर्ष कालावधी पूर्ण झालेला आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर सभासदांची वर्गवारी करणे कायद्याने व पोटनियमाने संस्थेवर बंधनकारक आहे त्यानुसार संस्थेने सदरची वर्गवारी केलेली आहे.
पोटनियम व कायद्यातील तरतुदीनुसार ज्या सभासदांना कळविणे जरुरीचे आहे अशा सभासदांना नोटीस देवून कळविणेत आले आहे. कोणत्याही सभासदाचे सभासदत्व रद्द केलेले नाही फक्त वर्गवारी केलेली आहे. वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीमुळे सभासदामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून माहिती दिलेली आहे.
————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज