mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आ.आवताडे-परीचारकांच्या प्रयत्नाने नामसंकीर्तन सभागृहाच्या विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर; ‘या’ आहेत उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्याच्या ३५ गावांच्या पाण्यासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न; इतर समस्याही सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : आ.समाधान आवताडे

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेमधील नामसंकीर्तन सभागृहातील विविध बाबींच्या विकासासाठी २० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, माजी आमदार प्रशांत परिचारक व मी मिळून पंढरपूर शहरातील भौतिक आणि सांप्रदायिक वैभवाचे प्रतिक असणाऱ्या या सभागृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा आणि पत्रव्यहार केला होता.

२०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडून मंजूरी मिळाली होती त्यावेळेस २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता मंजूर झालेल्या निधीमधून सदर नामसंर्कितन सभागृहाचे बांधकाम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे. मात्र उर्वरित निधी सध्या मिळाला आहे.

देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर शहरासाठी आणि भागवत धर्माचे पाईक असणाऱ्या वारकरी भक्तांच्या किर्तन अस्मितेसाठी आवश्यक असणारे नामसंकीर्तन सभागृह या निधीमुळे देखण्या रूपामध्ये पंढरी नगरीमध्ये उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर वर्षभर विविध वारीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये कीर्तनसेवा करणाऱ्या भाविकांना व कीर्तनकार मंडळींना या सभागृहामुळे अध्यात्मिक विचारांची मांडणी करण्यासाठी सुलभ आणि प्रशस्त व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आ.आवताडे म्हणाले.

सभागृहामध्ये उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा

सदर निधी अंतर्गत पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहामध्ये उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा पुढील प्रमाणे – सभागृहामध्ये आधुनिक पद्धतीने विद्युत व्यवस्था करणे, भव्य ऑडिटोरियम रूम ची निर्मिती करणे, सुबक पद्धतीने ड्रेनेज व्यवस्था करणे, पाणी व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते, लँडस्केपिंग आधी सुविधांची निर्मिती होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार परिचारकआमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
Next Post

जीवनात यश मिळवायचे असेल तर शॉर्टकट नसतो; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे भालके करियर अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा