mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘दामाजी’ला कोणाच्या सहकार्यामुळे ९४ कोटी कर्ज मंजुर झाले? प्रशांत परिचारक यांनी थेट जाहीर केलं नाव; राजकारण न आणता मदतीचा हात देऊन संस्था ठिकवावी; परीचारकांनी टोचले विरोधकांचे कान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 21, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
‘दामाजी’ला कोणाच्या सहकार्यामुळे ९४ कोटी कर्ज मंजुर झाले? प्रशांत परिचारक यांनी थेट जाहीर केलं नाव; राजकारण न आणता मदतीचा हात देऊन संस्था ठिकवावी; परीचारकांनी टोचले विरोधकांचे कान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री संत दामाजी सह.साखर कारखान्यावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कृतज्ञता सोहळा आणि भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन आयोजन केले होते.

सदर प्रसंगी संत दामाजी कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम, नवी दिल्ली यांचेकडून कारखाना उभारणी पासूनचे इतिहासत प्रथमच रु.९४.०० कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळवून देणेकामी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कारखान्याचे वतीने श्री संत दामाजीची मुर्ती भेट देवून सत्कार करणेत आला,

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल सह. सा. कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथदादा भालके, माजी संचालक व जिजामता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, माजी व्हा. चेअरमन रामचंद्र वाकडे, माजी संचालक यादापा माळी, श्री पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे,

पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, पंढरपूर मार्केट कमिटीचे चेअरमन हरीशदावा गायकवाड, मार्केट कमिटीचे माजी सभापती दाजी पाटील, पांडूरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांत बुगडे, युवक नेते प्रणव परिचारक, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, वामन माने सर, सुभाष मस्के सर, दिलीप चव्हाण, लक्ष्मणतात्या धनवडे,

प्रशांत (भैय्या) देशमुख, राजुबापू गावडे, तानाजीबापू वाघमोडे, पांडूरंग घंटी, भास्कर कसगावडे, रतिलाल गावडे, रामचंद्र जगताप, मारुतीबापू वाकडे, अजित जगताप, प्रविण खवतोडे, कल्याण रोकडे यांचाही कारखान्याचे वतीने चेअरमन-शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी (भाऊ) खरात, सर्व संचालक मंडळ सदस्य यांचे हस्ते सत्कार संपन्न झाला.

संचालक भारत बेदरे उपस्थिताचे स्वागत व प्रस्ताविक करताना म्हणाले की, कारखाना उभारणीपासूनचे इतिहासात प्रथमच एन.सी.डी.सी. कहुन नुकतेच रु.९४.०० कोटी एवढया मोठया प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात मोलाची भुमिका प्रशांत मालकानी पार पाडलेली आहे.

स्व.सुधाकरपंत परिचारक मालक यांचे काळापासुन दामाजी कारखान्यास मदत करणेचा वारसा त्यानी जपला आहे. तसेच त्यानंतरचे काळात स्व.आमदार भारत भालके व स्व. चरणुकाका पाटील यांचेही कारखान्यासाठी मोलाचे योगदान लाभलेले आहे. याबद्दल त्यांचे मंगळवेढा तालुक्याचे वतीने अभिनंदन करून सर्वं उपस्थितांचे स्वागत केले.

सत्कारमुर्ती प्रशांत परिचारक सदर प्रसंगी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखान्यास ९४ कोटी कर्ज मंजुर झाले असून तेच अभिनंदनास पात्र आहेत.

उद्योजक आपण उत्पादन केलेल्या मालांचा दर तो स्वतः ठरवितो, परंतु साखर कारखानदारांनी उत्पादित केलेली साखर व इतर पदार्थाचा दर ठरविणे कारखानदार व शेतकरी यांचे हातात नाही. ऊसाची किंमत शासन ठरविते, तो ठरविलेला ऊस दर शेतकऱ्यास देणे कारखानदारास बंधनकारक असते.

आम्ही सहकारी संस्थेत राजकारण न आणता मदतीचा हात देऊन संस्था ठिकावी यासाठी पुर्वीपासूनच सहकारी संस्थेस मदत करतो. कारखानदारी उभी करणे सोपी असून ती चालविणे फार जिकीरीचे आहे,

तसेच संचालक मंडळ निवडून आल्यानंतर संस्थापक धनश्री परिवार व माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल सह.सा. कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके, कर्मयोगी पतसंस्थेचे मार्गदर्शन उमेश परिचारक, माजी संचालक व जिजामता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, माजी संचालक दामोदर देशमुख,

रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी गळीत हंगाम चालु करणेसाठी आर्थिक मदत करुन मोलाचे सहकार्य केले असल्यामुळे ते खरे सत्कारास व अभिनंदनास पात्र आहेत.

संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांची मागील असणारी देणी देण्याचा प्रयत्न करावा, कारखाना आर्थिक अडचणीत असताना तालुक्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी संचालक मंडळावर विश्वास टाकून सभासदत्व स्विकारलेले असून हे महाराष्ट्रातील साखर कारखानदारातील एकमेव उदाहरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कारखान्यास NCDC कडून ९४ कोटी कर्ज उपलब्ध करुन दिलेबद्दल प्रशांत परिचारक यांचे आभार मानून विठ्ठल सह.सा. कारखान्याचे माजी चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक भालके म्हणाले, सभासद व कर्मचारी कारखान्याच्या रथाचे दोन चाके असून कारखान्याच्या चढ़ उतारामध्ये कर्मचाऱ्यांनी दामाजी कारखान्यासाठी योगदान दिलेले आहे.

त्यांचे थकित पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दयावीत, या संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे ऊसास चांगला दर देऊन शेतकऱ्यांचे राहणीमान ऊविण्याचे काम केलेले आहे त्याचध्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी आपले अध्यक्षीय भाषणात समविचारी आघाडीचे मार्गदर्शक प्रशांत परिचारक व भगिरथ भालके यांचे अचुक मार्गदर्शनामुळे समविचारीचे संचालक मंडळ कारखान्यावर निवडून येऊन गेली दोन गळीत हंगाम यशस्वी पार पाहून संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केलेला आहे.

परिचारक कुटुं‌बियांनी दामाजी कारखान्यास नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे असे आवर्जुन सांगितले. प्रशांत परिचारक यांचे सहकार्यामुळे NCDC कडून ९४ कोटी मिळाले असून या रकमेचा विनियोग योग्य व अचूक कामासाठी संचालक मंडळाने करून कारखान्यास उपपदार्थ प्रकल्प निमिर्तींसाठी प्रयत्न करावेत असे सांगीतले.

सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले की, मंगळवेढा दुष्काळी तालुक्यातील सामान्य शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी यांचा विकास व्हावा या उद्देशाने आदरणीय कै. कि. रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकिलसाहेब व कै. रतनचंद शहा शेठजी, कै. चरणुकाका पाटील यांनी सहकारी तत्वावर सुरु केलेल्या या आपल्या साखर कारखान्याची वरचेवर प्रगती व्हावी या हेतुने आपण सर्वजण प्रयम करित असलेचे सांगितले,

कारखाना आर्थिक अडचणीत असताना आपले मार्गदर्शक सोलापुर जिल्हयाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एन.सी.डी. सी. कहुन नुकतेच रु.९४.०० कोटी एवढया मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका पार पाडलेली आहे.

संस्थेसमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी असताना या संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून आपणां सर्वांची या संस्थेवर असणारी निष्ठा व सहकार्यामुळे येणाऱ्या अडचणीवर मात करीत आहेत.

कारखाना आर्थिक अडचणीत असताना धनश्री परिवाराचे संस्थापक व माजी चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल सह.सा. कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथदादा भालके, कर्मयोगी पतसंस्थेचे मार्गदर्शन उमेशजी परिचारक, माजी संचालक व जिजामता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, माजी संचालक दामोदर देशमुख, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी आर्थिक मदत करुन कारखाना चालु राहणेसाठी मोलाचे सहकार्य केले,

कारखान्याचा कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसताना जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस उत्पादकांना दर दिलेला आहे. एन.सी. डीसीचे कर्ज मिळालेनंतर कामगारांचा मागील संचालक मंडळाचे काळातील थकित असलेला ३२ महिन्याचा प्रॉव्हीडंट फंड प्रथम प्राधान्याने भरला आहे. तसेच कामगारांचे पगार वेळेवर दिलेले आहेत.

कारखाना चालवत असताना कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी काटकसर करुन कारखाना चालविण्यास मोलाचे योगदान दिलेले आहे. भविष्यात डिस्टलरी (असावणी) प्रकल्प उभारणी व कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेणार असून ते लवकरच पुर्णत्वास नेण्याचा मानस आहे. तरी तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी यांनी आपला ऊस इतरत्र न घालता दामाजी कारखान्यास देऊन सहकार्य करावे.

यावेळी कृषी प्रदर्शनाचे अनुषंगाने कार्यक्षेत्रातील उत्स उत्पादक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शेती विषयक विविध स्टॉलचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन तानाजीभाऊ खरात व संचालक मंडळ सदस्यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आले.

कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा प्रसंगी सभासदांना मार्गदर्शन करताना सुरेश माने-पाटील, माजी ऊस शास्वज्ञ, व्ही. एस.आय. पुणे यांचे ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन बावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी ऊसासाठी पूर्व मशागत कशी करावी, ऊस पिकासाठी वेळोवेळी खत मात्रा कशी द्यावी, पाणी व्यवस्थापन कसे करावे,

कमी पाण्यात ऊस पिक पिकवण्यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करावा व शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा, तसेच ऊस सरीतील अंतर किमीत-कमी ६ फुट ठेवावे, चांगल्या ऊस उताराऱ्यासाठी चांगल्या प्रतीचे ऊस बेणे वापर करावे, इत्यादीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विद्यावेत्ता नेटाफिम इरिगेशन चे विभाग प्रमुख

श्री. अरुण देशमुख यांनी ठिबक सिंचन प्रणाली वापर याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले, तसेच भविष्यकाळात मा नियोजन-पुर्वक कमी पाण्यात शेती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर प्रसंगी मोठ्या संखेने सभासद शेतकरी पांडूरंग कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच मंगळवेढा तालुक्यातील पप्पू स्वामी, श्रीकांत साळे, एकनाथ होळकर, कांतीलाल ताटे, विष्णू मासाळ, विजय बुरकूल, नितीन पाटील, भिमराव मोरे, रणजितसिंह पाटील,

सिध्देश्वर डोके, हेमंत निकम, उल्हास पाटील, अमोल वाकडे, रामचंद्र नागणे, दत्तात्रय यादव, मुरलीधर सरकळे, दौलत माने, तम्मा जगदाळे, काशिनाथ पाटील, भारत पाटील, जालिंदर व्हनुटगी, बिराप्पा कोकरे, अशोक माळी, बाबासो पाटील, रामभाऊ माळी, शहाजी उन्हाळे, राजाराम जगताप, दामाजी सह.

साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औबर वाडवेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा बोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिध्द् निवेदिका स्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक रेवणसिध्द लिगाडे यांनी केले.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दामाजी कारखाना

संबंधित बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावणार; सत्ता आणण्यासाठी जीवाचं रान करणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग..

October 25, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

October 25, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात पिकपच्या धडकेत दुचाकीवरील एकुलत्या एक मुलासह दोघांचा मृत्यू; मृतामध्ये संगणक अभियंत्याचा समावेश

October 25, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
Next Post
मोठी बातमी! महाराष्ट्र नवनिर्माण सेना व दिलीप धोत्रे यांच्या वतीने २२ सप्टेंबरला मंगळवेढ्यात मनसे केसरी कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन; एक व दोन नंबरची कुस्ती होणार पाच लाखांची

नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज रंगणार कुस्त्याचा फड; 'मनसे केसरी'चे अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराचा धुमधडाका

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

ब्रेकिंग! निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025

खळबळ! अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील भाच्या विरुध्द गुन्हा दाखल

October 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा