मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना संसर्गजन्य साथीला रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाने जिल्हा बंदी असतानाही मंगळवेढा तालुक्यात बेकायदा प्रवेश करणाऱ्या आठजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे.याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा व जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.
या कालावधीत राज्यातून,जिल्हयातून प्रवास करण्यावर बंदी असतानाही परशूराम कुबेर कोळी , संजीवनी आमसिध्द कोळी,बाबासाहेब शिवानंद बुध्दयाळकर, रत्नाबाई शिवानंद बुध्दयाळकर (सर्वजण रा.डोणज),बिरूदेव निवृत्ती मासाळ ( रा . सलगर बु ),आदींनी २ मे रोजी तर धनाजी लक्ष्मण नरळे (रा.महमदाबाद हुन्नूर), लकपिल रामू राठोड , सुजाता कपिल राठोड (रा.दोघे खडकी) यांनी ४ मे रोजी मंगळवेढा तालुक्यात प्रवास केल्याने भा . दं . वि . कलम १८८ व २६९ आपत्ती व्यवस्थापन , २०५५ चे कलम ५१ – ब नुसार पोलिस नाईक राजकुमार ढोबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
—————–
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज