मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग ।
निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना निवडणूक काळात लागू असलेल्या विविध नियमांची एक यादी मनपा अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. यात प्रसिद्धिपत्रकांच्या बिलांचा उल्लेख असून,

त्यावेळेस सादर न केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात, शिवाय यात दंडाचीही तरतूद करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.

निवडणुकीतील प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव तसेच छपाईची संख्या प्रकाशित करणे बंधनकारक आहे. हे तपशील नमूद न केल्यास संबंधित छापखाना मालकास तुरुंगवास, आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तसेच उमेदवाराने प्रत्येक पत्रक, हस्तपत्रक, घोषणा फलक किंवा भित्तिपत्रके लावण्यापूर्वी त्याची प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

प्रचार साहित्याचा स्रोत स्पष्ट ठेवणे आवश्यक असून, जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती पसरवली जाणार नाही. कोणतीही बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह सामग्री छापल्यास मुद्रक व प्रकाशक यांना जबाबदार धरले जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सर्व प्रचार साहित्यावर हे तपशील असणे आवश्यक असून, तसे न केल्यास ही आचारसंहितेची पायमल्ली मानली जाणार आहे, असे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

नगरसेवकपदासाठी ९ लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा
नगरसेवकपदासाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांना एकूण ९ लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. किती प्रसिद्धिपत्रके छापण्यात आली, त्यांची संख्या व त्यांची बिले वेळेत सादर करावीत अन्यथा संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील. यात दंडाचीही तरतूद आहे.- सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














