मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अनैतिक संबंधाच्या कारणावरून माझ्या मुलाचा खून त्याच्या पत्नीनेच केल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी दिल्याने आरोपी महिले विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील शिवबा नगर भागात १९ फेब्रुवारी रोजी घडल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील शिवबा नगर भागातील यल्लाप्पा लक्ष्मण देगलूरकर (वय ३०) यांचे पत्नीशी नेहमी भांडण व्हायचे. असाच प्रकार १९ रोजी ही घडला. त्यात यल्लाप्पा देगलूरकर यांचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याला जाळण्यात आले. या प्रकरणात त्याची पत्नी ज्योती यल्लाप्पा हीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वडील लक्ष्मण गंगाराम देगलूरकर धानोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्योती यल्लाप्पा देगलूरकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस( दि. २०) रोजी न्यायालयापुढे उभे केले असता आरोपीस २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलिस निरीक्षक भगवान धबडगे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज