मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर रेल्वे स्टेशन येथील शेड जवळ एक अनोखळी व्यक्ती जुनाट अजाराने मयत झाली आहे . सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे , आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे .
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे ७५ वर्षे असून , उंची ५ फुट ४ इंच , वर्ण काळा सावळा , अंगाने साधारण , चेहरा गोल , नाक बसके , केस सफेद , अंगात निळसर रंगाचे जॅकेट , पांढरा मळकट शर्ट व सफेद मळकट पायजमा असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे .
संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज