मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । भारत बायोटेक द्वारे विकसित करण्यात आलेली भारतातील पहिली कोविड -19 लस – COVAXIN ™, च्या मानवी क्लिनिकल चाचण्यांच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यास डीजीसीआयकडून मान्यता मिळाली आहे. भारतात ही पहिली लस तयार केली जात असून मानवावर तपासणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2020 मध्ये ही चाचणी सुरू होईल. India’s first coronavirus vaccine, covacin, has been approved for testing in humans
भारतात कोविड -19 लस तयार करणारी ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (नवी दिल्ली, भारत बायोटेक,डीजीसीआय,कोविड -19 लस,आयसीएमआर,एनआयव्ही,) यांच्या संयुक्त विद्यमाने लस तयार करण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे
या लसीला भारत बायोटेक ने बनवले आहे. या लसीचे मानवावरील परीक्षण जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे.या लसीला भारतीय चिकित्सा अनुसंधान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी यांच्या सहयोगातून विकसित करण्यात आले आहे.
भारत बायोटेक विकसित केलेली भारताची पहिली स्वदेशी कोविड -19 लस कोव्हॅक्सिन मानवी चाचण्यांमध्ये यशस्वीरीत्या दाखल झाली. @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @rajeshtope11 @AjitPawarSpeaks @BharatBiotech #COVID19India pic.twitter.com/yuykm7AHZh
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) June 30, 2020
व्हायरसच्या स्ट्रेनला पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीत आईसोलेट करून भारत बायोटेक कडे पाठवण्यात आले, जिथे या स्वदेशी लसीला विकसित करण्यात आले. जगभरात कोरोनाच्या १०० पेक्षा जास्त लसीवर वर काम सुरू आहे पण अजून कोणालाही यामध्ये यश मिळालेले नाही.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज