mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

CoronaVirus : 50 रुग्ण ठणठणीत तरही संख्या 490 वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
CoronaVirus : 50 रुग्ण ठणठणीत तरही संख्या 490 वर



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  राज्यात काल कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई,१० मुंबई परिसरातील,पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्ण,वाशिम व रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२,पुणे महानगरपालिका ४१३,नागपूर महापालिका २१०पथके कार्यरत आहेत. पथकामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.काल पर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. दोन एप्रिलला राज्यात कोरोना बाधित ८१ नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील ५७ रुग्ण मुंबई, ६ पुणे,3 पिंपरी चिंचवड, ९ अहमदनगर, ५ ठाणे, १ बुलढाणा रुग्णाचा समावेश होता. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४१६ इतकी होती. आता हा आकडा ४९० च्या घरात पोहोचला आहे.

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं कोरोनाची लागण झालेल्या एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. मृताच्या कुटुंबियांना विलगिकरणात ठेवलं आहे. तर ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल २४ ने वाढ होऊन ती  ६४  झाली आहे. यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या चार महापालिका क्षेत्रांमधल्या २४ रूग्णांचा समावेश असून त्यातले सर्वाधिक ११ रुग्ण हे नवी मुंबईतलें आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी – ६, मीरा भाईंदर ५ आणि ठाण्यातल्या २ रुग्णांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ४८ तासांनंतर दोन रुग्ण मिळाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित दोन रुग्ण आढळले आहेत. यातला एक रुग्ण उमरगा तालुक्यातला असून दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातल्या धानूरी इथला आहे. तो मुंबईत एका ५ स्टार हॉटेलमध्ये काम करत होता. काही दिवसापूर्वी तो गावी आला होता. त्याला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी ठेवलं जाणार आहे, तर त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंडे यांनी सागितले.

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित व्यक्ती आढळला नसून दिल्लीच्या निझामोद्दीन इथं झालेल्या मरकज मधून आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. त्याच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. आणखी तीन व्यक्ती दिल्लीवरून आल्या असून त्यांनाही विलगीकरणात ठेवले आहे. त्यांचा मरकजशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्रसार माध्यमांना दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरमधील सापडलेला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. त्याला सध्या डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हयात आढळलेला कणकवली तालुक्यातला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे. २४ तासातले त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. मात्र या रुग्णाला पुढचे काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला धुळ्यातने तब्बल १६ जण गेले होते. याशिवाय तबलिगी जमातचे ५८ जण धुळ्यात आले होते, त्यांचा शोध घेऊन प्रशासनाने तपासणी आणि उपचार सुरु केले आहेत. यामध्ये नेपाळ तसंच मुंबई, भुवनेश्वर इथून आलेल्या प्रत्येकी ११ जणांचा समावेश आहे. अशा ७४ जणांची तपासणी केली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दिल्ली निजामुद्दीन संमेलनात १० जण क्वारंटाइन केलेले झाले पसार

दिल्ली निजामुद्दीन संमेलनात १० जण क्वारंटाइन केलेले झाले पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 15, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 15, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा