मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सांगोला आणि मोहोळ वगळता इतर कोणत्याही तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नव्हता मात्र आज पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे मुंबईहून आलेल्या एका तरूणाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात एकच खळखळ उडाली आहे.
मागील दोन महिन्यापासून कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे पंढरपूर व तालुका कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. गेल्या दोन महिन्यात मुंबई व पुण्याहून अनेक लोक तालुक्यात आले. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पंढरपूर तालुका कोरोनापासून मुक्त होता.
दरम्यान, मागील तीन चार दिवसांपूर्वी एक तरूण मुंबईहून उपरी येथे आला होता. दोन दिवसापूर्वी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तपासणीमध्ये त्याचा कोरोपा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आज निष्पन्न झाले आहे.
तालुक्यात कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रशासनाने उपरी परिसर व बाजूचा तीन किलोमीटर परिसर सील केला असल्याची माहिती आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज