मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयसीटीई , डिटीई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वेरीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे.
ऑनलाइन पध्दतीचा अवलंब इंजिनिअरिंग पदवी व पदविका , कॉलेज ऑफ फार्मसी पदवी व पदविका तसेच एमबीए विभागाकडून करण्यात येत आहे . सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून या विषाणूपासून बचावासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.
स्वेरीकडून देखील ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम अमलात आणले जात आहेत . त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विषयांनुसार व प्रकरणानुसार व्हिडिओ लेक्चर्स , नोट्स , कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद , त्यांच्या शंकांचे निरसन या बाबींचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज