टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणू सोबत लढण्यासाठी संपूर्ण जगणे दंड थोपटले असून यात भारत आघाडीवर आहे. आपल्या देशामध्ये रोज 80 ते 90 हजार रुग्ण सापडत असले तरी इतर देशांच्या तुलनेत देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आज देशातील जवळपास 81 टक्के रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या मनात ‘मला कोरोना तर झाला नाही’ असा विचार आला असेल.
मात्र लोकांच्या मनात भीती असली तरी यापासून कसा बचाव करावा हे देखील माहिती होत आहे. मात्र तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर सर्वात आधी काय करावे हे जाणून घ्या.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यास घरातच विलगिकरण व्हा आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात येऊ नका.
मास्क दिवसभर घाला आणि वापरानंतर योग्य विल्हेवाट लावा.
विलगिकरणात असताना कुटुंबातील सदस्यांपासून 6 फूट अंतर राखा.
वेळोवेळी ताप मोजत रहा.
जर तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि तुम्हाला कोणतीही लक्षणे नसली तरी वरील नियमांचे पालन करा.
यासह तुम्हाला लक्षणे जाणवत असतील आणि अहवाल येण्यास काही काळ जाणार असेल तरीही वरील स्वतःला कोरोना रुग्ण समजून नियमांचे पालन करा.
तसेच लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यास स्वतःला 10 दिवस घरात क्वारंटाईन करून घ्या आणि डॉक्टरांचे योग्य उपचार घ्या. 10 दिवसांनी कोणतेही लक्षण न दिसल्यास आयसोलेट राहण्याची आवश्यकता नाही.
Corona report positive? Don’t be afraid, follow the rules first
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज