मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असताना कोरोनाने ग्रामीण भागात पण शिरकाव केला आहे.माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पाटील यांनी दिली आहे.
आज दिनांक 6 मे रोजी उपविभागीय दंडाधिकारी तथाअधिकारी तथा INCUNENT COMMANDER माळशिरस विभाग या खात्याने. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मौजे कोळेगाव तालुका माळशिरस हद्दीमधील दुपडे वस्तीमध्ये एक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळला असून त्यास तत्काळ सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.
त्याच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्या समास संपर्कात आलेले होते. त्या साठी त्या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे या सर्व बाबींचा विचार करून व सदर रुग्णाने उपरोक्त नमूद भागांमध्ये प्रवास केलेल्या असल्याने दुपडे वस्ती कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर केंद्रस्थानी धरून 700 मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र व दुपडे वस्ती कोळेगाव माळशिरस जिल्हा सोलापूर परिसर केंद्रस्थानी धरून 5 किलोमीटरच्या परिसरात क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे.
सरकारच्या सूचना प्रमाणे प्रतिबंधित व बफर क्षेत्रात असलेल्या सूचनेप्रमाणे तात्काळ पुढील कारवाई करावी अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा INCUNENT COMMANDER माळशिरस विभाग अकलूज शमा पवार यांनी माहिती दिली.
ही तर मॉक ड्रिल
माळशिरस तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीची कोरोना संबंधीत किती तयारी व जागरूकता आहे हे पहणेसाठी कोळेगाव येथे आज सर्व विभागामार्फत कोरोनाची रंगीत तालीम (mock drill) घेणेत आली.
सर्व विभागानी कार्यक्षमतेने व उत्कृष्ट समन्वयाने काम केले आहे.तालूकयात अजून तरी कोरोनाचा एकही व्यक्ती नसून सर्व लोकांना घरातच राहून सहकार्य करावे करण्याचे आवाहन प्रांताधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
—————-
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज