mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जवान नागप्पा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर श्रीनगरमध्येच अंत्यसंस्कार होणार; कुटुंबीयांचा आक्रोश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
जवान नागप्पा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर श्रीनगरमध्येच अंत्यसंस्कार होणार; कुटुंबीयांचा आक्रोश

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचे जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचा निरोप सुरुवातीला लष्कराकडून मिळाला. संपूर्ण गाव मृतदेहाची वाट पाहू लागला; मात्र नागप्पाचा मृत्यू कोरोनाने झाला असून अंत्यसंस्कार श्रीनगरलाच होणार असल्याचे शेवटच्या क्षणी सांगण्यात आले. Corona kills soldier at border;  The funeral will be held in Srinagar

नागप्पा म्हेत्रे हे शेतकरी कुटुंबातील असून ते 2011 साली भारतीय सैन्यदलात सेवेत रुजू झाले होते. सध्या श्रीनगरमध्ये ते कर्तव्य बजावत होते. मार्च महिन्यात ते हुलजंती गावी सुट्टीसाठी आले होते.  लॉकडाऊनमुळे ते साडेतीन महिने गावीच होते. सध्या सीमेवर वाढता तणाव असल्याने सर्व सैनिकांना बोलावणे आले होते.

तसेच श्रीनगरकडे जाण्यासाठी पासही मिळाल्याने ते २४ जून रोजी रेल्वेने दिल्लीला गेले. तेथून त्यांना १५ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. ११ जुलैला श्रीनगर येथे पोहोचल्यानंतर १८ जुलै रोजी बाहेरून आलेल्या जवानांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

२६ जुलैला ते ड्यूटीवर हजर होणार होते, तत्पूर्वी शनिवारी रात्री आठ वाजता छातीत दुखू लागल्याने त्यांना तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते; मात्र याठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टेम करण्यापूर्वी स्वॅब घेऊन कोरोना चाचणी घेतली असता पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यानंतर लष्कर अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पार्थिव तिकडे पाठवता येत नाही, तरी येथेच अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी द्या असे सांगितले; मात्र कुटुंबीयांनी परवानगीसाठी नकार दिला. याबाबत मंगळवेढा येथील पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी कुटुंबीयांना भेटून त्यांची समजूत काढली. 

अंत्यदर्शनही होऊ न शकल्याने कुटुंबीयांचा आक्रोश

नागप्पा यांचे २००४ साली लग्न झाले. वैष्णवी व माही या दोन मुली असून माही ही फक्त चार महिन्यांची आहे तर वैष्णवी ही सहा वर्षांची आहे वडिलांचे निधन झाले आहे. दोघे भाऊ असून एकजण शेती करतो तर एकजण होमगार्ड आहे. आईही शेती कामात मुलांना मदत करते. तीन विवाहित बहिणी असून एकजण सोलापूर शहर पोलीस दलात सेवेत आहे. वडील वारल्यानंतर नागप्पा हा तसा कुटुंबकर्ता होता.

देशाची रक्षा करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याने त्याच्या दोन चिमुकल्याचे पितृछत्र हरपले आहे. या वीर जवानाचे अख्खे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. त्याच्या आई,पत्नीचे व आठ वर्षीय चिमुकलींचे अश्रू थांबता थांबत नाहीत. केवळ चार महिने वय असलेल्या माही या मुलीला अजून जग कळायच्या अगोदरच तिचे पिता जग सोडून गेल्याचे दु:ख कुटुंबीयांसह अख्ख्या गावाला झाले आहे.

अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाचे व्हिडिओ व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन

जवान नागप्पा याचे निधन कोरोनाने झाले याबाबत कुटुंबीय मान्य करायला तयार नव्हते. यावर तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलीस निरीक्षक जोतिराम  गुंजवटे यांनी श्रीनगर येथील लष्कर अधिकारी यांना फोन जोडून दिला असता संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

तब्बल तीन तास कुटुंबियांच्या सुरू असलेल्या चर्चेत अखेर तोडगा काढण्यात आला. जवान नागप्पा यांचे मुखदर्शन व्हिडीओ कॉल द्वारे करून मगच अंत्यसंस्कार करण्यात येणार  आहेत तसेच त्यांची सर्व कार्यवाही झाल्यानंतर अस्थी कुटुंबियांना देण्यात येतील  असे लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली 

—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दुर्दैवी घटना : सांगोल्यात दारूच्या नशेत पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

दुर्दैवी घटना : सांगोल्यात दारूच्या नशेत पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! सुसाट कंटेनरने हिरावले दोन तरुण प्राण; गावावर शोककळा, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची रुग्णालयात प्राणज्योत मालवली

April 5, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा