mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 6, 2026
in मंगळवेढा, राजकारण
सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील मतदार नागरिकांचा सर्व समावेशक आणि अपेक्षित विकास साधने हेच माझ्या लोकसेवेचे प्रमुख व्हिजन असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार करुणाताई जनार्धन शिवशरण यांनी व्यक्त केले आहे.

लक्ष्मीदहिवडी गटातील विविध गावांचा गाव भेट प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी तसेच प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली गटातील महिलांचे सर्व गुणसंपन्न सबलीकरण तसेच

आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्रस्थापित करण्यासाठी मी मिळालेल्या संधीचे निश्चित सोनं करणार आहे.

माझ्या पाठीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरीही लोकहिताची आणि लोक संवादाची मोठी शिदोरी माझ्या पाठीमागे खंबीर असल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून एक उद्योजिका या नात्याने मी सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात असून कोणत्याही प्रकारचा जातीभेद अथवा समाजभेद मनामध्ये न ठेवता मी प्रामाणिकपणे माझ्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक हिताच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

प्रचार दौऱ्यानिमित्त मतदारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद आणि लोक समर्थांचे मोठे वातावरण हे आमच्या विजयाची प्रमुख नांदी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राजकारणात टीकेला फारसे महत्त्व न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकासावर भाष्य करणे आणि विकासात्मक बाबींना प्राधान्य देत जनतेच्या सेवेसाठी उभा राहणे हे परिवर्तनशील समाजक्रांतीचे प्रमुख चित्र आहे. त्यामुळे कोणत्याही टीकेला मी टीकेच्या माध्यमातून उत्तर न देता विकासाच्या रूपाने जनतेला दाखवून देणार असल्याचा ठाम निर्धार आणि विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

लक्ष्मी दहिवडी गटाच्या उज्वल भविष्याच्या विकासात्मक वाटचालीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करुणाताई शिवशरण तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार विनायक यादव आणि दिपाली ताड यांच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वादाच्या रूपाने त्यांना विजयी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.

अपक्ष उमेदवार ज्योती संतोष सोनवले यांचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार ज्योती संतोष सोनवले यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार करुणाताई जनार्दन शिवशरण व पंचायत समिती गणाचे उमेदवार विनायक यादव यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कोणत्याही प्रकारचे राजकीय समीकरण डोळ्यासमोर न ठेवता केवळ मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला गती देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

अपक्ष उमेदवार संतोष सोनवणे यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये त्यांना विश्वासात घेऊन आपण या गटातील राजकीय वाटचाल आणि विकासाचे धोरण अवलंबणार असल्याचे मत उमेदवार करुणाताई शिवशरण यांनी व्यक्त करून त्यांचे जाहीर आभार मानले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: करुणा शिवशरण

संबंधित बातम्या

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

खळबळ! पंचायत समितीत ‘बदल’ वारे! विजयकुमार देशमुखांकडे सूत्रे; प्रशासकीय कामांना मिळणार नवी गती?

March 26, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
Next Post
समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला; प्रदीप खांडेकर यांचा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा

भावनिक आवाहनांना जनतेची चपराक? भोसे जिल्हा परिषद गटात विकासाचा अजेंडा वरचढ; विजयाचे प्रमुख दावेदार प्रदीप खांडेकर हेच असल्याची मतदारांमध्ये चर्चा

ताज्या बातम्या

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा