mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही; कॉंग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2021
in राजकारण, राज्य
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र, कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदे आणि मिळणारा निधी अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांची घुसमट होत आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस स्वबळावरच लढेल, असे कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरताच पक्ष असून कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे.आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही आहोत, अशी कडवट टीकाही भानुदास माळी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

सोलापुरात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे.

राज्यात स्वबळावर निवडणूका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनांनुसारच मी राज्यभर ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करीत आहे.

आतापर्यंत 21 जिल्ह्यांमध्ये दौरे केले असून, आगामी काळात तालुका स्तरावरील संघटन मजबूत करण्याचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले.

आमच्या सरकारने 2009 ते 2013 या काळात सामाजिक सर्वेक्षण करून इम्पिरियल डाटा तयार केला. तोच, डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे.

परंतु, तत्कालीन फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये; म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव ‘आरएसएस’च्या माध्यमातून भाजपने आखल्याचेही माळी म्हणाले.

परंतु, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण न भेटल्यास त्यांना पक्षांतर्गत आरक्षण देऊन निवडणुकीत संधी दिली जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षपदावर कॉंग्रेसचाच हक्क

ओबीसी समाजाच्या अडीअडचणी राज्य व केंद्र स्तरावर ठामपणे मांडून प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत.

त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना निश्‍चितपणे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसकडून मंत्रिपद मिळेल, असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, विधानसभेचे अध्यक्षपद हे कॉंग्रेसचे असून त्यावर कोणीही हक्‍क सांगू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना फटकारले.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: काँग्रेससोलापूर

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
Next Post
सिध्देश्वर आवताडे यांच्या गावभेटी दौऱ्यास आजपासून सुरुवात

दिलदारपणा! संत दामाजी पुतळ्याचे सुशोभीकरण स्वःखर्चातुन करणार : सिध्देश्वर आवताडे

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा