
टीम मंगळवेढा टाईम्स । काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिलीय. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडी मधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निधी वाटपा बाबत काँग्रेसच्या आमदारांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय.
याबाबत राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांशीही बोलनं झालंय. मात्र, अद्याप काही न्याय मिळाला नसल्याची भावना गोरंट्याल यांनी व्यक्त केली. लवकर सोनिया गांधींचीही भेट घेणार असल्याचं गोरंट्याल यांनी म्हंटलं आहे.
जालना शहरासह मतदारसंघातील विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. निधीसाठी काँग्रेसच्या 11 आमदारांनी पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळत नसल्यामुळं काँग्रेसमधील आमदार नाराज आहेत.
जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात तीन नगरपालिका आहेत. यामध्ये अंबड, परतूर आणि जालना आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यत 29 कोटी रुपयांचा निधी आला होता.
मात्र. काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. विशेष म्हणजे या बाबतीत शिवसेना नेते आणि जिल्हा प्रमुखांच्या बाबतीत नरमाईचे धोरण बाळगत निधीसाठी एका लेटर पॅडवर सुद्धा शिवसेना नेत्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय.
दरम्यान आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील पक्षश्रेष्टींशी बोलणं झालं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर घातलं असल्याचं गोरंट्याल यांनी म्हंटलंय. मात्र, अद्याप आम्हाला न्याय मिळाला नसून लवकरच काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितलं.
आगामी विधानसभा अधिवेशनात माझ्यासह सर्व 11 आमदार उपोषणाला बसणार किंवा सभात्याग करू असा इशाराही त्यांनी दिलाय.
यापूर्वी कैलास गोरंट्याल यांनी आपल्याच पक्षावर नाराजी प्रगट केली होती. ज्यात त्यांनी मंत्री पदी आपला विचार केला नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान यापूर्वी त्यांची नाराजी दूर करण्यात पक्ष श्रेष्टीना यश आलं होतं. आता यावेळी काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


11 Congress MLAs in Mahavikas Aghadi angry; Will go on a hunger strike against the government
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













