मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी वाळूचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळणार असल्याचे पालकमंत्री तथा महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
जांबुड (ता. माळशिरस) येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात बंद असलेल्या वाळू उपशाला अखेर शासनाकडून परवानगी मिळाली आहे.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, रवी पाटील, शशिकांत चव्हाण, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, विधान परिषद सदस्य जयंत आसगांवकर,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जांबुडच्या सरपंच स्वाती खटके, उपसरपंच सुहास यादव, ग्रामपंचायत सदस्य विश्रांती कचरे, सजाता माने, हर्षवर्धन भोसले उपस्थित होते.
याप्रसंगी समाधान नाईकनवरे, बिरू थोरात, सचिन चंदनशिवे, सुमित भोसले, अर्जुन अडसूळ, भीमराव खटके, सतीश पवार, शिवाजी केचे, हणमंत बेलदर, राहुल खटके, दादासाहेब माने, ग्रामसेवक जाधव, शहाजी कचरे आदी उपस्थित होते.
१८ हजार ब्रास वाळू उपसा होणार…
माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील वाळू ठिकाणाहून जवळपास ५ हजार ब्रास, उंबरे (वे) येथून ५ हजार ब्रास, तर जांबुड येथून ८ हजार ब्रासचा वाळू उपसा होणार आहे.
त्यामुळे मागणी करणाऱ्या लोकांना नव्या वाळू धोरणानुसार प्रतिब्रास ६०० रुपयांनी वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज