टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद हु.वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यात मासे धरण्यासाठी गेल्या तिघापैकी प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे 20 वर्षीय उच्चशिक्षित अभियंता तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद हु येथे घडली आहे. पाण्यात वाहून जाण्याची या पंधरवड्यातील तालुक्यातील तिसरी घटना आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महमदाबाद परिसरात असणारे सिमेंट बंधारे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत.
अशा परिस्थितीत काल गेल्या दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू भरून वाहू लागले आहेत. अशा वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी तिघे जण गेले होते.
पण वेगात वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनिल इंगोले हा युवक वाहून गेला. शंकर शिरसागर याने इतर दोघांना वाचवले. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून उपस्थित नातेवाईकांनी त्याचा आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळच्या वेळी अंधारात शोध कार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे रेस्क्यू पथकाला पाचारण केले.
हुन्नुर ते ममदाबाद हु रस्त्यावर असणाऱ्या या पुलावरील संरक्षक कठड्याच्या वरून पाणी जात असल्यामुळे या पुलावरून सध्या वाहतूक करणे धोकादायक आहे.
अशा परिस्थितीत या भागातील नागरिक धोकादायक वाहतूक करीत आहेत. सध्या या पुलावर संरक्षक कठडे बसण्याची आवश्यकता असल्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
पंधरा दिवसात तीन घटना; चार जण मृत्युमुखी..
सध्या बेसुमार पावसामुळे भीमा, माण नद्यासह गावोगावच्या ओढे नाल्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. नद्या पात्राबाहेर येऊन वाहत आहेत गत महिन्यात तळसंगी येथे शेततळ्यात पाणी वाढल्याने त्याचा अंदाज न आल्याने तीन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि १७ सप्टेंबर रोजी घडली त्यानंतर माण नदी ला पूर आल्याने मारापूर येथील सेवानिवृत्त लाईनमन बंधाऱ्यात वाहून गेल्याने दि १९ सप्टेंबर रोजी ते मृत्युमुखी पडले.
त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बेसुमार झालेल्या पावसाने महदाबाद ( हु) वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली या घटना पाहता नागरिकांनी या पूर परिस्थितीत मोठी काळजी घेण्याची गरज आहे.
Mangalwedha The college boy who went fishing went into the water carrying, calling the rescue team; Search begins
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज