टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेला सांगोला येथील जनावरांचा बाजार सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
रविवार, दि.५ मार्च रोजी सांगोल्याचा जनावरांचा आठवडा बाजार भरणार असल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी लसीकरण झालेली जनावरे बाजारात खरेदी-विक्रीसाठी आणावीत, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा सहायक निबंधक प्रकाश नालवार यांनी केले आहे.
लम्पी स्किन आजाराची खिलार गाय व संकरित गाय आदी जनावरांना लागण झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेला सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद होता.
लम्पीच्या प्रादर्भातामळे सांगोला तालुक्यातील सुमारे ३५३ जनावरे मरण पावली आहेत.
दरम्यान, लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांकडून सांगोला येथील बंद जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे केली होती.
आमदार पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जनावरांचा बाजार सुरू करण्याची विनंती केली होती.
तसेच शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना जनावरांचा बंद असलेला सांगोल्यातील बाजार सुरू करावा, अशी मागणी केली होती. अखेर नेते, शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आल्याचे माजी सभापती गिरीश गंगथडे यांनी सांगितले.
लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक
शेतकरी व्यापारी यांनी आपल्याकडील जनावरांना किमान २८ दिवसांपूर्वी लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण व लाळ खुरकत प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेली जनावरे बाजारात आणणे आवश्यक आहे.
त्याकरिता सक्षम पशुवैद्यकीय अधिकारी यांचे लसीकरण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत आणावे. तसेच बाजार समितीतर्फे बाजार परिसराची स्वच्छ व निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दोन जनावरांमधील बांधण्याचे अंतर केवळ निरोगी जनावरांना बाजारात प्रवेश द्यावा. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील
कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदी अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश पारित केले आहेत.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज