टीम मंगळवेढा टाईम्स।
उन्हामुळे नुसता वैताग आलाय. लेकरांना तर चटके सहन होईनात.. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाबद्दल प्रतिक्रिया. या साऱ्यांचा विचार करून सोलापूर जिल्हा परिषदने आज दि.१ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी पत्रान्वये ही माहिती दिली. शाळा सकाळच्या सत्रात सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान ३७ अंशांवर गेले आहे.
वाढत्या उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या सत्रात बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे.
वाढत्या उन्हात शाळेतील मुलांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे.
सध्या माध्यमिक सत्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कामांसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत.
कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी सलभा वठारे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज