टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे दोन गटात हाणामारी होऊन दाखल झालेल्या परस्पर फिर्यादीनुसार १४ जणांविरुद्ध गंभीर जखमी केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही गटाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत भिन्नता असल्याने कारवाई करणे पोलिसांपुढे आव्हान आहे.
याबाबतची माहिती अशी, फटेवाडी येथे दोन गटांत शनिवारी हाणामारी झाली. परस्पर फिर्यादीनुसार १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या फिर्यादीत दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्री कुलस्वामिनी शिवजन्मोत्सव तरुण मंडळ व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव बदलण्याच्या कारणावरून संदीपान मोहन वाडदेकर (वय ३४) याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून
तसेच त्याच्या आई-वडिलांना दगडाने व काठीने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चंद्रकांत इंगोले, देवाप्पा इंगोले, नागन्नाथ इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले, दादा इंगोले, समाधान इंगोले, अजित इंगोले आदी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी हातात कुऱ्हाड व काठी घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विरोधी दुसऱ्या फिर्यादीत दि. ७ फेब्रुवारी रोजी १०:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी निलाबाई ज्ञानेश्वर इंगोले (वय ६५) या कुटुंबासोबत घरी झोपल्या असताना
द्राक्ष बागेत म्हशी सोडण्याचे कारणावरून मोहन मुरलीधर वाडदेकर याने शिवीगाळ करून मुलगा देवराज यास हातातील काठीने मारहाण केली. उजव्या दंडाला चावा घेतला.
तुम्हास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. संदीप मोहन वाडदेकर याने फिर्यादीचा मुलगा देवराज याचे पाठीत दगड मारून व फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून घेऊन गेला.
शोभा मोहन वाडदेकर, शीतल संदीप वाडदेकर यांनी सुध्दा शिवीगाळ केली. तसेच त्यांचेबरोबर दोन अनोळखी आलेले लोकांनीहाताने मारहाण करुन शिवीगाळी केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत पवार हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज