mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 25, 2022
in राजकारण, राज्य
संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला.

‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत.

असं असतानाच आता शिवसेनेकडून छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला जात असल्याचा दावा करत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिलाय.

नेमका गोंधळ काय?

राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे.

अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने संभाजीराजे यांना सूचक इशारा दिला.

कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची दुसरी उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली. संभाजीराजे हे कोल्हापूरचे आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याची रणनीती शिवसेनेने आखली.

सकाळी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना तातडीने मुंबईत येण्याचा व राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचा आदेश देण्यात आला.

त्यानंतर संजय पवार मुंबईत दाखल झाले व शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्यासोबत त्यांनी कागदपत्रांची तयारी सुरू केली.

राऊत काय म्हणाले?

या सर्व घडामोडींबाबत माध्यमांनी शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराबाबत विचारले असता, संजय पवार हे दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरत आहेत.

मात्र, उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असे राऊत यांनी सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांचा आम्ही सन्मान करतो. पण राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

मराठा क्रांती मोर्चाकडून संजय राऊतांना इशारा

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून संजय राऊत यांना इशारा दिलाय. “छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत.

एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत,

सत्ता भोगत आहेत (त्यांनाच विरोध करता.) या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असं असताना देखील संजय राऊत हे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत,” असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाने शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त केलीय.

पुढे बोलताना अंकुश कदम यांनी थेट शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार असणाऱ्या संजय राऊतांना इशारा दिलाय.

“संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही.

२०२४ ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार,” असं कदम म्हणालेत.

संजय पवार काय म्हणाले?

मुंबईत आलेल्या संजय पवार यांना तुम्ही मूळ उमेदवार असणार की तुमचा अर्ज डमी उमेदवार म्हणून भरण्यात येत आहे, असे विचारले असता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. ते म्हणतील तसे होईल, असे उत्तर संजय पवार यांनी दिले.

दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय होणार
संभाजीराजे हे अद्यापही शिवसेनेत प्रवेश करण्यास अनुकूल नाहीत. येत्या दोन दिवसांत संभाजीराजे यांच्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.(स्रोत:लोकसत्ता)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संजय राऊतसंभाजीराजे छत्रपती

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 21, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 20, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 20, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
Next Post
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

मोठी बातमी! विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; 'या' तारखेला मतदान असा असेल निवडणूक कार्यक्रम

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 21, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा