mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आर्थिक गणनेसाठी नागरिकांनी अचूक माहिती द्यावी : जिल्हाधिकारी शंभरकर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आर्थिक गणनेसाठी नागरिकांनी अचूक माहिती द्यावी : जिल्हाधिकारी शंभरकर

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा

सातव्या आर्थिक गणनेसाठी जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांच्या माहिती संकलनाचे काम सुरु आहे. यासाठी प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

सातव्या आर्थिक गणनेच्या अनुषंगाने येणा-या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा सांख्यिकी अधिकारी पुंडलिक गोडसे, महानगरपालिका, जिल्हा परिषद अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सातव्या आर्थिक गणनेचे काम नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. ही गणना मोबाईल ॲपद्वारे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यात 1364 प्रगणक नियुक्त केले आहेत. आत्तापर्यंत एक लाख 77 हजार कुटुंबांची आर्थिक गणना करण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ लाख कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्याचे उद्दीष्ट्य असल्याचे सांख्यिकी अधिकारी गोडसे यांनी सांगितले.

आर्थिक गणना कशासाठी – जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्राच्या संरचनेबाबत माहिती मिळवण्यासाठी गणना केली जाते. काम करणा-यांची संरचना कशी आहे. कोणकोणत्या उद्योगात कार्यरत आहेत. त्या उद्योग घटकांना भेडसावणारे प्रश्न, त्यासाठी निश्चित करायची धोरणे याबाबत माहिती गोळा केली जाणार आहे.

संकलित केल्या जाणा-या बाबी – कुटुंब प्रमुखाचे आस्थापनेचे नांव, कुटुंबातील सदस्य संख्या, कुटुंबामार्फत चालविण्यात येत असलेल्या आस्थापनेचा कार्यस्थितीचा तपशील, उद्योगात कार्यरत कर्मचा-यांची संख्या, उद्योग व्यवसायाचा प्रमुख वित्तीय स्त्रोत.

कॉमन सर्व्हिस सेंटरकडून कामकाज – सातवी आर्थिक गणनेची माहिती संकलित करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंट ई गव्हर्नन्सकडून नेमलेल्या प्रगणकाकडून करण्यात येत आहे. यासाठी गाव पातळीवरील कॉमन सर्व्हिस सेंटरचे चालक हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत. कामासाठी सोलापूर जिल्ह्यातील गावपातळीवरील एकूण 445 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांच्या अधिनस्त 1364 प्रगणक नेमण्यात आले आहे. सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांना कॉमन सर्व्हिस सेंटर ई गव्हर्नन्स द्वारे सातव्या आर्थिक गणनेच्या कामासाठी ओळखपत्र देण्यात आले आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in


This News First Publish on mangalwedhatimes.in®



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: SamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले : प्रा.संतोष पवार

विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले : प्रा.संतोष पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा