टीम मंगळवेढा टाईम्स ।
नऊपैकी चार वाळू घाटांचा लिलाव फायनल झाला असून एकूण ६९ कोटी रुपयांचा महसूल या चार वाळू घाटांतून मिळणार आहे.
रघुनाथ नागणे यांच्या कंपनीने दोन वाळू घाटांसाठी तब्बल २६.७० कोटींची बोली लावली आहे. यासोबत लाईफस्टाईल आणि आरबी एंटरप्राइजेस या दोघांनीही दोन वाळू घाटांसाठी प्रत्येकी २१ कोटी ३३ लाखांची बोली लावली आहे.
सोमवारी बोली महसूल रक्कम जमा करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते महिनाभरात ठेकेदारांना वाळू उपसा करता येईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.
वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून नऊपैकी सात वाळू ठिकाणांना प्रतिसाद मिळाला आहे. सातपैकी चार वाळू घाटांना चांगला महसूल मिळाला असून इतर तीन घाटांना कमी महसूल
मिळाला आहे.
तब्बल तीन वर्षांनंतर जिल्ह्यातील नऊ वाळूसाठ्यांचा लिलाव झाला. लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला असून सोमवारी लिलाव रक्कम जमा होईल. त्यानंतर संबंधितांना वाळूसाठ्यांचा ताबा देण्यात येणार आहे.
जवळपास ६२ हजार ९०० ब्रास वाळूचा लिलाव झाला असून यातून ६५ कोटींचा महसूल प्रतिवर्षी मिळणार आहे. ठेकेदाराने प्रति ब्रास अकरा हजार रुपयांप्रमाणे बोली लावली असून या लिलावामुळे शहर व ग्रामीण परिसरातील हजारो बांधकामांना वाळू आता सहज उपलब्ध होणार आहे.
वाळू लिलाव ३ वर्षांसाठी झाला असून प्रतिवर्षी प्रशासनाला ६५ कोटींचा महसूल मिळणार आहे.
वाळू नसल्याने किंवा वाळूचा लिलाव न झाल्य अनेक शासकीय बांधकामेदेखील थांबली आहेत.आता या सर्वांना वाळू मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.
साठा क्रमांक १ ला सर्वात जास्त बोली
लाईफस्टाईल कंपनीने अर्धनारी – बठाण येथील साठा क्रमांक १ ला सर्वात जास्त बोली लागली आहे.शासकीय बोली ६.९ ३ कोटी किंमत असताना २१ कोटी ३३ लाख रुपये बोली लावून या वाळूसाठ्याची मालकी मिळवली आहे.
त्यानंतर साठा क्रमांक-२ साठी आरबी इंटरप्राईजेसने ६.९० कोटी किमत असताना २१.३० कोटी रुपयांची बोली लावली आहे.
तर रघुनाथ नागणे यांच्या कंपनीने बठाण क्रमांक तीन आणि अर्धनारी घाट क्रमांक एकसाठी बोली लावली.
बठाण क्रमांक ३ साठी १४ कोटी ८० लाख तर अर्धनारी घाट नंबर १ साठी ११ कोटी ९० लाखांची बोली लावून या घाटाचा ताबा मिळवला आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज