मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथे एक तीन वर्षीय बालक उकळत्या पाण्याच्या पातेल्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तो मरण पावला.
रविराज संदीप डांगे असे त्या बालकाचे नाव आहे. मुढवी येथील रविराज डांगे हे बालक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता राहते घरी खेळत असताना चुलीवर ठेवलेल्या गरम पाण्याच्या पातेल्यात पडले होते.
या जखमी बालकाला प्रथमतः पंढरपूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. तद्नंतर अधिक उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज