टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे.
सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यातून सरकारचे मंत्री सुद्धा वाचले नाहीत.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती.
आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंर आता त्यांच्या आई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती.
त्यानंतर आज रश्मी ठाकरे यांचासुद्धा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रश्मी ठाकरे या त्यांच्या निवासस्थानीच राहून कोरोनाचे उपचार घेणार असल्याची माहित सध्या मिळत आहे.
दरम्यान राज्यात आज 28,699 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2247495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 230641 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज