टीम मंगळवेढा टाईम्स ।
राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे.
त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांवी वैध ठरवली आहे.
गोगावले यांची नियुक्ती योग्य
शिवसेनेच्या घटनेनुसार एकट्या ठाकरे यांना सर्व निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांची केलेली हकालपट्टी मान्य करता येत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख गटनेत्याला पदावरुन काढू शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारणीतील नेत्यांसोबत ते निर्णय घेऊ शकतात.
पक्ष प्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम राहणार आहे. यामुळे पक्ष प्रमुखाचा निर्णय अंतिम हे मान्य करता येत नाही. २०१८ मध्ये केलेली पदरचना आणि घटनेतील बदल मान्य करता येणार नाही. शिवसेनेची १९९९ मधील घटनाच मान्य करता येणार आहे.
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली. गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष गेल्याचे आता स्पष्ट झाले.
शिंदेंच्या शिवसेनेवर खरा पक्ष म्हणून शिक्कामोर्तब
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं. तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली. तसेच यामुळं शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असंही यावेळी नार्वेकर यांनी म्हटलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज