टीम मंगळवेढा टाईम्स ।
दूधडेअरीवर गोळा केलेले दूध पोहोचवून परत निघालेल्या पिक अप चालकाने कमानीला जोराची धडक दिल्याने पिकअप चालकाचा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील सावे येथे घडली आहे.
देवीदास दत्तात्रय भोसले (30 रा.लक्ष्मीदहिवडी ता.मंगळवेढा) असे अपघातात मरण पावलेल्या पिकअप चालकाचे नाव होय.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, चालक देवीदास भोसले हा बुधवार दि.१० रोजी सकाळी दहा वाजन्याच्या सुमारास लक्ष्मी दूध डेअरी लक्ष्मी दहिवडी येथून दूधाचे कॅन्ड पिकअपमध्ये घेवून
दूधडेअरी येथे दूध घालून परत ११ वा. च्या सुमारास गावाकडे निघाला असताना सावे गावातील कमानीला जोराची धडक दिली असता
या अपघातात देविदास भोसले हा गंभीर जखमी झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला होता त्यास उपचाराकरिता ग्रामीण रूग्नालय येथे आणले असता डॉक्टरांनी देविदास भोसले हा उपचारापुर्वीच मयत असल्याचे सांगितले.
याबाबत राजकुमार सिध्देश्वर बर्गे यांनी चालक देविदास भोसले याने त्याच्या ताब्यातील पिक अप निष्काळजीपणाने चालवून स्वताच्या मरणास तसेच पिकअपचे ५० हजार रुपये किमतीचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज