मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शनिवार व रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसह विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस हे आज दुपारी १२:५५ वाजता सोलापूर विमानतळ येथे येतील. दुपारी १:२० वाजता पंढरपूर हेलिपॅड येथे दाखल. १:३५ वाजता शासकीय विश्रामगृहात पोहोचतील, दुपारी तीन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन,
दुपारी ३:५० वाजता पंचायत समिती येथील निर्मल दिंडी, चरणसेवा उपक्रम, आरोग्यवारीच्या समारोपाला उपस्थिती,
सायंकाळी ५:०५ वाजता सीसीटीव्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम व हरित वारी अॅपचे उद्घाटन व इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण, सायंकाळी ५:२० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन,
सायंकाळी ५:४५ वाजता ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप सोहळा, सायंकाळी सात वाजता प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. त्यानंतर मध्यरात्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महा पूजेला उपस्थित राहणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज